मधमाश्यांच्या हल्ल्यात चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:49+5:302021-06-11T04:21:49+5:30
संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर शिंदेआंबेरी येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी झाले आहेत. या सर्वांना ...
संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर शिंदेआंबेरी येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात प्राथमिक केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह चौघे जखमी झाले आहेत. या सर्वांना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. महामार्गावर साफसफाई करत असताना मधमाश्यांच्या पाेळ्याला धक्का लागल्याने माश्यांनी हल्ला केला.
रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला
खेड : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेग मर्यादित ठेवण्यात आला आहे. यावेळी सर्व गाड्या स्लो ट्रॅकवर येणार असून अतिवृष्टी कालावधीत तासी ४०कि.मी. वेगाने धावणार आहेत.
मोबाइल व्हॅन पिंजून काढतेय शहर
चिपळूण : गेल्या दोन महिन्यांपासून शासनाची मोबाइल व्हॅन शहर पिंजून काढत आहे. आत्तापर्यंत ३ हजार ७०८ जणांची ॲँटिजन चाचणी करण्यात आली असून, १३१ जण बाधित सापडले आहेत. ३४२ जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली आहे.
शिवराज्य दिन
खेड : खेड पंचायत समिती कार्यालयात शिवराज्य दिन पार पडला. सभापती मानसी जगदाळे यांच्या हस्ते पूजन करून भगव्या ध्वजास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती जीवन आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम उपस्थित होते.
रानगव्याचे दर्शन
दापोली : तालुक्यातील वणंद, खेर्डी, बांधतिवरे या मार्गावरील ग्रामस्थांना रानगव्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दापोलीतील अज्ञात शक्ती गायब
दापोली : गेले काही दिवस दापोली तालुक्यातील मौजेदापोली ग्रामस्थांना विविध प्रकारे मानसिक त्रास देणाऱ्या अज्ञातशक्ती गेले आठवडाभर पडणाऱ्या पावसाने गायब झाल्या आहेत. आठवडाभर ग्रामस्थांना काहीही त्रास न झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शाळेची घंटा यंदाही नाही वाजणार
रत्नागिरी : कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी नवागतांचा शाळा प्रवेश होऊ शकला नाही. ही महामारी अजूनही आटोक्यात न आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षाबाबत अजूनही अनिश्चिता दिसून येत आहे. यावेळेही विद्यार्थ्यांना बहुधा ऑनलाइन वर्गांना सामोरे जावे लागण्याची वेळ येणार असल्याची दाट शक्यता आहे.