भात उत्पादनाची चारसूत्री पध्दत व त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:09+5:302021-06-24T04:22:09+5:30

अन्नद्रव्याचा वापर वाढीव उत्पादनासाठी महत्त्वाचे पालाश हे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलीकाॅनअभावी भात नत्र खताचा कार्यक्षमरित्या उपयोग करू शकत नाही ...

Four-pronged method of rice production and its use | भात उत्पादनाची चारसूत्री पध्दत व त्याचा वापर

भात उत्पादनाची चारसूत्री पध्दत व त्याचा वापर

Next

अन्नद्रव्याचा वापर

वाढीव उत्पादनासाठी महत्त्वाचे पालाश हे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलीकाॅनअभावी भात नत्र खताचा कार्यक्षमरित्या उपयोग करू शकत नाही व रोगकिडीस लवकर बळी पडते. थोडक्यात भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना पालाशचा व सिलीकाॅनचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे गरजेचे आहे. भातपिकाच्या दीर्घकालीन उत्पादन वाढीसाठी भात पिकाने जमिनीतून घेतलेला पालाश व सिलीकाॅन जमिनीस परत करणे म्हणजेच त्याचा फेरवापर करणे हा एक परवडणारा उत्तम उपाय आहे, असे लक्षात येईल. भात पिकातील पालाश व सिलीकाॅन फेरवापरासाठी शेतकरी खालील दोन पध्दतींचा अवलंब करू शकतात.

वाळलेला भाताचा पेंढा भात लावणीपूर्वी हेक्टरी फक्त दोन टन या प्रमाणात शेवटच्या चिखलणीनंतर पसरावा. नंतर पायाने तुडवून चिखलात गाडावा. असे केल्याने पालाश व सिलीकाॅनचा पुरवठा होऊ शकतो.

तुसाची राख मिसळावी

भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोप वाफ्यात प्रत्येक चाैरस मीटरला अर्धा ते एक किलो या प्रमाणात बी पेरण्यापूर्वी ४ ते १० सेंटीमीटर खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे. तुसाची काळसर राख (पांढरी शुभ्र राख नव्हे) भाताचे तूस राबात जाळून करता येईल. असे करण्यामुळे राख मिळते. जळताना निर्माण होणारी उष्णता वाया जाते. योग्य प्रतिची काळसर राख तयार करावी

हिरवळीचे खत

गिरीपुष्पाच्या फांद्या बुंध्यापासून (३०-४०) सें. मी. उंचीवर कापाव्यात व शेवटच्या चिखलणीपूर्वी ६ ते ७ दिवस अगोदर शेतात पसराव्यात. या कालावधीत फांद्यावरील पाने शेतात गळून पडतात. त्यानंतर उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी अगर अन्य शेतीच्या कामासाठी वापराव्यात व शेवटची चिखलणी नेहमीप्रमाणे करावी. असे केल्याने शेताला सेंद्रिय खतातून हेक्टरी १२-१५ किलो नत्र मिळेल. हिरवळीचे खत शेतकऱ्यांना परवडते. नत्राचा पुरवठा रासायनिक खताला पूरक ठरतो.

Web Title: Four-pronged method of rice production and its use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.