चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:37 PM2019-01-24T13:37:23+5:302019-01-24T13:39:56+5:30

रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

Four years later, breathing empty-handed ... | चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

चार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...

Next
ठळक मुद्देचार वर्षानंतर थिबा घेणार मोकळा श्वास...परिसर विकास अंतिम टप्यात

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

दुरूस्तीच्या कामकाजामुळे राजवाड्यातील म्युझियमची वरच्या मजल्यावरील केवळ चार दालने पर्यटकांसाठी खुली असली तरी राजवाड्याचा बहुतांश भाग दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार वर्षे बंद ठेवण्यात आला आहे. परंतु येत्या वर्षभरात कामे तातडीने पूर्ण करून पर्यटकांसाठी संपूर्ण राजवाडा खुला करण्यात येणार आहे.


थिबा राजवाडा दुरूस्तीसाठी पाठविण्यात शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला तीन वर्षानंतर (२०१४-१५) मान्यता मिळाली होती. दुरूस्तीसाठी २ कोटी १७ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला व टप्याटप्याने दुरूस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला. दुसऱ्या टप्यातील दुरूस्तीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असले तरी आतापर्यत २ कोटी ३५ लाखाचा खर्च करण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यात छप्पर दुरूस्ती, कौले बदलणे, गच्ची, सज्जे, खिडक्या, जिने व पानपट्टी, पन्हळची कामे करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार संपूर्ण लाकडी काम सागवानी लाकडामध्ये करण्यात आले ेआहे.


परिसर विकास अंतिम टप्यात

दोन टप्यातील दुरूस्ती पूर्ण झाली असून परिसर विकास सुरू आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, चौकीदार केबीन, प्रसाधन गृहे, पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उपाहारगृह, वाहन पार्किंग व्यवस्थेचे काम अद्याप सुरू आहे.

ऐतिहासिक राजवाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. परिसर विकासाचे कामही सध्या अंतिम टप्यात आहे. राजवाड्याच्या मागील बाजुला असणारे संग्रहालय पाहता येत असले तरी राजवाड्याचा मुख्य प्रसाद मात्र पाहता येत नसल्याने बाहेरूनच दर्शन घेवून माघारी फिरावे लागत होते. परंतु आता लवकरच राजवाडा सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.

ब्रम्हदेशच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

ब्रम्हदेश राजघराण्यातील काही वंशज व राष्ट्राध्यक्षांनी पाच वर्षापूर्वी रत्नागिरीत येऊन थिबा राजवाडयाची पहाणी केली होती. त्यावेळी थिबाच्या समाधीचेही दर्शन घेतले होते. राजवाडयांची परिस्थिती पाहून त्यांनी दुरूस्तीसाठी निधी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शासनातर्फे दुरूस्ती सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.

तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी स्वत: राजवाड्याची पाहणी करून राजवाडा दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर कामांना बऱ्यापैकी वेग आला. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनीही आॅक्टोबरमध्ये पदभार स्विकारल्यानंतर राजवाड्याला भेट देवून विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे.

राजवाडयात सीसीटीव्ही

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमिवर राजवाडा व परिसरात शंभर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आतापर्यत २६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय पुरातत्व विभागातर्फे राज्यातील १२ वस्तू संग्रहालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेराखाली थिबा राजवाडा आल्याने राजवाडा,परिसर सुरक्षित झाला आहे. येत्या काही दिवसात राजवाड्यातील अन्य खोल्यांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.


परिसर विकासाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दालनाच्या सुशोभिकरणासाठी ९० लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या वर्षभरात प्रत्येक दालन सुशोभित करून संग्रहालय मांडले जाणार आहे. त्यानंतरच राजवाडा शंभर टक्के पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यासाठी अजून वर्षभराचा तरी कालावधी लागण्याची शक्यता आहे
- ऋत्विज आपटे,
जतन सहाय्यक, पुरातत्व विभाग.

Web Title: Four years later, breathing empty-handed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.