बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:52+5:302021-06-09T04:38:52+5:30

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. ...

The fragrant form of childhood rain is still remembered | बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

बालपणीच्या पावसाचे आल्हाददायी रूप अजूनही स्मरणात

googlenewsNext

मात्र, गेल्या २०-२५ वर्षांत काळानुरूप परिस्थिती पालटली. आधुनिकतेच्या नावाखाली शहरांची महानगरे झाली आणि गावांनाही शहरे होण्याची स्वप्ने पडू लागली. विकासाच्या नावाखाली अनेक बांधकामे झाली, त्यात इतकी वाढ झाली की आता ग्रामीण भागात ओसाड झालेल्या जमिनी विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी शोध सुरू झाला. त्यातही चढाओढ सुरू झाली आणि आता ग्रामीण भागातील जमिनींवरही अनेक मजल्यांच्या भव्य इमारती उभ्या राहू लागल्या. आता टुमदार घर केवळ स्वप्नातच आता सर्वत्रच अपार्टमेंट जणू काही एकमेकींना लगडून उभ्या राहू लागल्या आहेत.

या बांधकामांमध्ये गटारे, रस्ते सर्वच बुजविली जात आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजनाच नाही, तर या इमारतींमधील नागरिकांचे सांडपाणी कुठून जाणार? हा मुद्दा आहेच. कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. शहरातील गटारांची वेळेवर स्वच्छता नाही. त्याचे दुष्पपरिणाम पावसाळ्यात दिसतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की मग कचरा साचलेल्या गटारांमधून पाणी तुंबले जाते आणि शहरात महापूर यावा, तसे अनेक भागांत पाणीच पाणी दिसू लागते. आता तर अगदी समुद्रातही इमारती उभ्या राहत आहेत, अशा बांधकामांनाही मागणी वाढत आहे. आपण मनमानेली करताना निसर्गाच्या अस्तित्वाचा कुठेही विचार न करता आततायीपणा करू लागलो. आज बांधकामे एवढी वाढली आहेत की अगदी रस्त्यांवरही अतिक्रमणे सुरू आहेत.

सध्या रत्नागिरीची हीच स्थिती आहे. शहराच्या व्याप्तीपेक्षा इमारती अधिक अशी स्थिती आहे. जराशी कुठे जागा दिसली की बिल्डर त्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार उरकून अनेक नियमांना फाट्यावर बसवून वर्ष-दीड वर्षांत त्या जागेत इमारत उभी करतो. सध्या नियमांची पायमल्ली करत शहर आणि परिसराच्या अनेक भागांत रस्त्यांलगत बांधकामे बिनदिक्कतपणे उभी राहत आहेत. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून रस्ते अडवून वाहनांना अडचण करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अशा इमारतींना परवानगी कशी मिळते, हा संशोधनाचा विषय ठरावा. शहरांमध्ये येणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लाखो हे फ्लॅट विकले जातात.

काळानुरूप बदलताना, विकास करताना आपण निसर्गचक्राच्या विरोधात जावून सर्व गोष्टी करायला लागलो. त्यामुळेच आता निसर्गाचे रूप विध्वंसक पाऊस, पूर, चक्रीवादळ याच्या रूपाने दिसू लागले आहे. त्यातून आपण कघी शहाणपण घेणार?

Web Title: The fragrant form of childhood rain is still remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.