फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:04+5:302021-07-11T04:22:04+5:30
रत्नागिरी : फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल ९९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवार, ८ जुलै ...
रत्नागिरी : फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल ९९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवार, ८ जुलै रोजी दुपारी ३.५१ ते ६ वाजण्याचा दरम्यान घडला. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रवीण बबन पवार (३४, रा. गोळप, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार साहिल कुमार आणि मनजीत यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. या दाेघांनी पवार यांच्या गुगल पे अकाऊंटवर लिंक पाठवून फर्निचरचे बिल जमा करण्यास सांगितले. फर्निचरच्या बिलाच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ४९ हजार आणि दोनवेळा २४,९८५ असे एकूण ९८,९७० रुपये काढून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवीण पवार यांनी शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.