चिपळूण परिसरात विविध मंडळाच्यावतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 10:53 AM2017-10-26T10:53:16+5:302017-10-26T10:57:28+5:30
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
चिपळूण : राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
पेठमाप येथे झालेल्या चंदनरोप वाटप कार्यक्रमास नगरसेवक मनोज शिंदे, दत्तगुरु शेटये, करंजाई ढोल पथकाचे सदस्य हर्ष शिंदे, सौरभ आम्बुर्ले, अथर्व सागवेकर, दत्तगुरू शेट्ये, पप्पू महाडिक, शुभम संसारे, दुर्वांग होमकळस, पंकज तांबडे, निवळीचे विकास महाड़ीक उपस्थित होते. यावेळी शहरातील ‘गुरुकुल’ शैक्षणिक संकुलालाही चंदनरोपे भेट देण्यात आली.
संस्थेचे संचालक संजय दरेकर, त्यांचे सहकारी महेश जठार, मुल्ला, तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष मनोज मस्के, संतोष सुर्वे, जाधव, विद्याधर अजगोलकर, कोदारे, उपस्थित होते. फारशी तिठा येथील रिक्षा यूनियनच्या सदस्यांनाही चंदनरोपे भेट देण्यात आली. यावेळी दत्ताराम लोकरे, संतोष सुर्वे, पारधी, काशीराम मोरे, सुनील चोपडे, अनिल काणेकर,मयेकर, प्रकाश चोपडे, पडवेकर, भोसले, पेडणेकर उपस्थित होते.
गोवळकोट मधील स्थानिक तरुणांनी स्थापन केलेल्या ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ यांनाही रोपे देण्यात आली. चालू मौसमात रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे, अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चंदनतज्ज्ञ वनश्री महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने उपलब्ध होत असलेल्या चंदन रोपांचे, मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव-पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी वाटप केले.