मोफत शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:38+5:302021-05-30T04:25:38+5:30
लॉटरी प्रक्रिया पूर्ण रत्नागिरी : कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली ...
लॉटरी प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी : कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. लॉटरी नंबर लागलेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदोपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
खांब धोकादायक
देवरुख : संगमेश्वर शहर व परिसरात विजेचे खांब धोकादायक बनले आहेत. लोखंडी खांब जमिनीच्या खालून गंजले असल्याने केव्हाही पडून अपघाताचा धोका संभवतो. पावसाळा तोंडावर असल्याने विजेचे खांब तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी वीज ग्राहकांमधून होत आहे.
कारवाईचा इशारा
रत्नागिरी : रासायनिक खतांच्या छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खतविक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संशयित विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. युरिया खत वगळता अन्य रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कलमांना मागणी
रत्नागिरी : मृग नक्षत्रात नवीन लागवड करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू तसेच मसाल्याच्या रोपांची विक्री करण्यात येत आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर या रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे ही रोपे पावसाआधी काही दिवस आधी खरेदी केली जातात.