कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:34+5:302021-06-05T04:23:34+5:30
चिपळूण : शहरानजीकच्या कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलने कोरोनाकाळात पालकत्व गमावलेल्या चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना सातवीपर्यंतचे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय ...
चिपळूण : शहरानजीकच्या कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलने कोरोनाकाळात पालकत्व गमावलेल्या चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना सातवीपर्यंतचे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारी रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच शाळा ठरली आहे.
दिल्ली बोर्डाचे सीबीएसई पॅटर्न शिक्षण देणाऱ्या चिपळूणमधील इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीच्या एसीबी इंटरनॅशनल स्कूल आणि एसीबी प्ले स्कूलतर्फे कोविड १९ काळात पहिल्या लाटेपासून कोरोना व्हायरसमुळे पालकत्व हरपलेल्या मुलांना संपूर्ण शिक्षण देणार आहे. त्यात दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा मोफत देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. याविषयी एसीबी इंटरनॅशनल स्कूल संचालक मंडळांची चेअरमन ॲड. अमोल भोजने यांनी बैठकीत ही घोषणा केली. तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुख्य व्यवस्थापक नेहा महाडिक, मुख्याध्यापक राकेश भुरण, पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.