निराधार बालकांना देणार माेफत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:39+5:302021-06-23T04:21:39+5:30

लांजा : हेरिटेज कल्चर आर्ट ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ...

Free education for destitute children | निराधार बालकांना देणार माेफत शिक्षण

निराधार बालकांना देणार माेफत शिक्षण

Next

लांजा : हेरिटेज कल्चर आर्ट ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जावडे या शाळांमध्ये कोरोनासारख्या भयंकर आजारामध्ये निराधार झालेल्या सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे निवास व्यवस्थेसह मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा पवार यांनी दिली.

लांजा तालुक्यातील जावडे येथे ३ एकरच्या निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक व्यवस्थेने सुसज्ज इमारतीसह शासन मान्यतेने न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा या तीन शाळा चालविण्यात येतात. सध्या कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले असून, त्यामुळे अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. अशा परिस्थितीत समाजातील सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संस्थेने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयींयुक्त असे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Free education for destitute children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.