रत्नागिरीतील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:10+5:302021-07-07T04:38:10+5:30
रत्नागिरी : महामारीच्या काळातही लोकांपर्यंत घरबसल्या अचूक माहिती पोहोचावी, याकरिता पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यामध्ये अनेक ...
रत्नागिरी : महामारीच्या काळातही लोकांपर्यंत घरबसल्या अचूक माहिती पोहोचावी, याकरिता पत्रकार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यामध्ये अनेक पत्रकारांना त्यांचा जीवही गमवावा लागला. काेराेना काळात पत्रकारांनी त्यांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी, वेळोवेळी तपासणी करावी, या उद्देशाने रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टिक्स सेंटरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी सीबीसी, कॅल्शिअम, क्रेटानिन, कोलेस्ट्राॅल तसेच रक्तातील साखरेच्या पातळीची तपासणी केली. सेंटरतर्फे आयोजित शिबिरात पत्रकारांची तपासणी तसेच आरोग्यविषयक शंकांचे निरसन करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली. रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टिक्सतर्फे नेहमीच विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या शिबिराला रत्नागिरीतील पत्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
-------------------------------------------
रत्नागिरीतील प्राईम डायग्नाेस्टिक्स सेंटरतर्फे आयाेजित आराेग्य तपासणी शिबिरात डॉ. तरन्नुम खलिफे यांच्याहस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.