लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी रिक्षाची मोफत व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:51+5:302021-05-11T04:32:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या महामारीत प्रत्येकजण आपल्यापरीने मदतीसाठी पुढाकार घेत आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील उद्योजक सौरभ ...

Free rickshaw ride to the vaccination center | लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी रिक्षाची मोफत व्यवस्था

लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी रिक्षाची मोफत व्यवस्था

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या महामारीत प्रत्येकजण आपल्यापरीने मदतीसाठी पुढाकार घेत आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील उद्योजक सौरभ मलुष्टे या तरुणाने लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था केली आहे. एक कॉल करा आणि रिक्षा तुमच्या दारात अशी मदतीची नवी संकल्पना सौरभ मलुष्टे या तरुणाने हाती घेतली आहे.

कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकच प्रभावी उपाय समोर आला आहे. लसीकरण करून घेण्यासाठी अनेकजण सकाळपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. जवळ वाहन नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्र गाठताना दमछाक होत आहे. अशांसाठी सौरभ मलुष्टे हा तरुण धावून आला आहे.

साळवी स्टॉप ते शिवाजी नगर या भागात मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भागात राहणारे जेष्ठ नागरिक, महिला आणि ज्यांच्याकडे वाहन नाही अशा सर्वांना कोकण नगर लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी ही मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या आदल्या दिवशी एक फोन कॉल केल्यानंतर लसीकरणादिवशी लसीकरण केंद्रावर सोडण्यासाठी आणि परत घेऊन येण्यासाठी रिक्षा सेवा पुरवली जाणार आहे. यासाठी सौरभ मलुष्टे, योगेश वीरकर आणि सुनील बेंडखळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Free rickshaw ride to the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.