स्वातंत्र्यसेनानी आशाताई पाथरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:14+5:302021-04-28T04:34:14+5:30
रत्नागिरी : शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आशाताई पाथरे यांचे गुजरातमधील जामनगर येथे मंगळवारी सकाळी निधन झाले. नुकतेच त्यांनी १०१ ...
रत्नागिरी : शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आशाताई पाथरे यांचे गुजरातमधील जामनगर येथे मंगळवारी सकाळी निधन झाले. नुकतेच त्यांनी १०१ व्या वर्षात पदार्पण केले होते.
आशाताईंनी सांगली येथील विलिंग्डन काॅलेजमध्ये शिकत असताना चले जावच्या चळवळीत भाग घेतला होता. त्यांच्या वर्गातील सर्व मुले या चळवळीत उतरली होती. त्यानंतरही त्यांनी येरवडा येथील कारागृहात सक्तमजुरीची शिक्षाही भोगली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक आठवणी त्या अगदी समरसून सांगत.
गेली काही वर्षे त्या आपल्या कन्येकडे जामनगर येथे राहत होत्या. मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचा सहभाग घेतलेला रत्नागिरीतील एक मुख्य दुवा निखळला असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात मुलगी, सून तसेच नातवंडे असा परिवार आहे.