नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादळाला "फुल्ल स्टॉप"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:23 PM2019-03-22T20:23:59+5:302019-03-22T20:25:54+5:30
कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या सभेदरम्यान बांदिवडेकर यांच्या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून आव्हाड यांनी आपले मत मांडले.
कुडाळ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातनची काही संबंध नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे ते सत्य असेल तर आमचा त्यांच्या उमेदवारीला कोणताही आक्षेप नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज कुडाळ येथे मांडली. त्यामुळे बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादळ आला फुल स्टॉप मिळण्याची शक्यता आहे.
कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या सभेदरम्यान बांदिवडेकर यांच्या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून आव्हाड यांनी आपले मत मांडले. यावेळी ते म्हणाले बांदिवडेकर यांनी यापूर्वीच सनातनशी आपले कोणतेही संबंध नाहीत असे जाहीर केले आहे. सद्यस्थितीत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते सत्य असेल तर आमचा कोणताही विरोध नाही. त्यांचा प्रचार राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करतील यात काही शंका नाही असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रांतिक सदस्य काका कुडाळकर यांनी दुजोरा दिला. यावेळी विकास सावंत, बाळ कनियाळकर, सुरेश गवस, बाळा गावडे आदी उपस्थित होते.