निधी होणार दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:37+5:302021-09-22T04:34:37+5:30
घाट दुरुस्तीची मागणी रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नादुरुस्त झाला आहे. तात्पुरती डागडुजी करून ...
घाट दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंबा घाट जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नादुरुस्त झाला आहे. तात्पुरती डागडुजी करून घाट छोट्या वाहनांना सुरू करण्यात आला असला तरी मोठ्या व अवजड वाहतुकीसाठी बंदी आहे. त्यामुळे प्रवास वेळकाढू व खर्चीक बनला आहे. तातडीने घाट दुरुस्तीची मागणी होत आहे.
कृती आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्यातील नगर पंचायती व नगर परिषदांच्या पुढील स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे. शून्य कचरा व रस्ते दत्तक योजनेची अंमलबजावणी केली आहे. यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. १५०५ किलोमीटर रस्त्यापैकी १०८ किलोमीटरचे मुख्य रस्ते असून यातील जास्तीत जास्त रस्ते या योजनेंतर्गत दत्तक देण्याचा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावर खड्डे पडले असून, मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. छोट्याच नव्हे तर मोठ्या वाहनांनाही वाहतुकीसाठी मार्ग धोकादायक बनला आहे. अवजड वाहने तर खड्ड्यात अडकून पडत आहेत. मात्र, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मासिक सभा २९ रोजी
राजापूर : तालुका पंचायत समितीची मासिक सभा २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभापती करुणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली किसान भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी तालुक्यातील विकासकामाचा आढावा घेण्यात येणार आहे. रस्त्यावर खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.