वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन 

By संदीप बांद्रे | Published: November 13, 2023 05:13 PM2023-11-13T17:13:22+5:302023-11-13T17:13:45+5:30

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू ...

Funds for removal of silt from Vashishthi River will not be allowed to fall, Minister Uday Samant assurance | वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन 

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री उदय सामंतांचे आश्वासन 

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी साेमवारी (१३ नाेव्हेंबर) येथे दिले.

चिपळूण येथील उक्ताड जुवाड येथे वाशिष्ठी नदीमधील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष सुरेखा खराडे, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे यांच्यासह चिपळूण बचाव समितीचे सदस्य तसेच नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, गाळ काढणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे. चिपळूणकरांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना नदीला येणाऱ्या पुरापासून भयमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. वाशिष्ठी नदीचे गाळ काढण्याचे काम थांबणार नाही. येथील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन या संस्थेने मोठा हातभार लावला आहे. यासाठी आपण नाना पाटेकर यांचे आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

आमदार शेखर निकम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. चिपळूण बचाव समितीचे शहनवाज शहा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Web Title: Funds for removal of silt from Vashishthi River will not be allowed to fall, Minister Uday Samant assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.