दुर्देवी घटना! चिपळूण तालुक्यात एकाच सरणावर तिघांचे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:18 PM2020-12-04T18:18:18+5:302020-12-04T18:21:55+5:30

Chiplun, WaterDeath, Ratnagirinews, Police चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील आईसह दोन लेकरांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी उघडकीस आली. या तिघांनाही एकाच सरणावर ठेवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकी भीषण दुर्घटना असुर्डे पंचक्रोशीत पहिल्यांदाच घडली आहे.

Funeral on three at the same place | दुर्देवी घटना! चिपळूण तालुक्यात एकाच सरणावर तिघांचे अंत्यसंस्कार

दुर्देवी घटना! चिपळूण तालुक्यात एकाच सरणावर तिघांचे अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देदुर्देवी घटना! चिपळूण तालुक्यात एकाच सरणावर तिघांचे अंत्यसंस्कारअसुर्डे येथील आईसह दोन लेकरांचा बुडून मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील असुर्डे येथील आईसह दोन लेकरांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी उघडकीस आली. या तिघांनाही एकाच सरणावर ठेवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकी भीषण दुर्घटना असुर्डे पंचक्रोशीत पहिल्यांदाच घडली आहे.

मयुरी बाबाराम चौगुले (३५). त्यांचा मुलगा हर्ष बाबाराम चौगुले (११), मुलगी शारदा बाबाराम चौगुले (१३, सर्व रा. असुर्डे) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. मयुरी या मंगळवारी आपल्या दोन मुलांसह असुर्डे धरणाजवळ लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या असताना ही दुर्घटना घडली.

या दुर्दैवी घटनेमुळे चौगुले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या तिघांच्याही मृतदेहांचे विच्छेदन झाल्यानंतर असुर्डे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात बुधवारी रात्री ८ वाजता तिघांनाही एकाच सरणावर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेतील मृत मयुरी यांचे पती वडील बाबाराम चौगुले हे चिपळूण पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत असल्याने पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असुर्डे येथे जाऊन बाबाराम यांचे सांत्वन केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Funeral on three at the same place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.