जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:38+5:302021-09-21T04:35:38+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले ...
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले असून, १४५ रुग्ण बरे झाले आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात रुग्णांमध्ये कोरोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना चाचण्या करण्याच्या प्रमाणतही घट झाली असून, ३,३२९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंडणगड आणि राजापूर तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यात दापोली तालुक्यात ६, गुहागरात २, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत १३, लांजात केवळ १ आणि खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७७,३३९ रुग्ण झाले आहेत.
मंडणगड तालुक्यात २ आणि खेडमध्ये एक अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,३९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.१० टक्के झाला आहे. जिल्ह्यात एकूण ७४,२२४ बाधित कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.९७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ७२१ रुग्ण उपचार घेत आहेत.