कोकणातला गणपती वाटे आपलासा ! उत्सव म्हणजे दिवाळीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 09:46 PM2017-08-25T21:46:57+5:302017-08-25T21:49:10+5:30

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी दिवाळीच. प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने येथे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत उत्सवाची रंगत अनुभवण्यासारखी असते.

Ganapati is in Konkan! The festival is Diwali. | कोकणातला गणपती वाटे आपलासा ! उत्सव म्हणजे दिवाळीच...

कोकणातला गणपती वाटे आपलासा ! उत्सव म्हणजे दिवाळीच...

Next
ठळक मुद्देकोकणातील गणेशोत्सव सर्वांनी एकदा तरी अनुभवावाच.जगाच्या पाठीवर कोठेही असणारा चाकरमानी हा हमखास येणारच, नाच, नमन, खेळ््ये, पत्त्यांचे डाव उत्तरोत्तर रंगलेल्या डावात अगदी गणेशोत्सवाचे एकामागून एक दिवस सरत असतात.

शेखर धोंगडे -- कोल्हापूर
गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी दिवाळीच. प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने येथे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत उत्सवाची रंगत अनुभवण्यासारखी असते. डोंगरवाटा नि भातशेतीच्या डोलणाºया पिकातून डोक्यावरून येणारा गणराया म्हणजे कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण आणणाराच असतो.

सिंधु महोत्सवाची धुळवड संपवून चाकरमानी मुंबईला निघतात ते पुन्हा सरत्या श्रावणानंतरच्या गणरायाच्या आगमनाची ओढ मनात घेऊनच. मस्त भारधस्त पावसानंतर धरणी, हिरव्या नक्षत्राची लेणं लेपून सजते... लतावेली, वृक्षांच्या पानापासून निसटते ते चैतन्यसृष्टीला वेगळेच तेज देते. डोलणारी कोकणातली भातशेतं, मांड, पोफळी सगळेच हात उंचावून आनंदाने सृष्टीतल्या नवनिर्मितीचे स्वागत करतात. अगदी त्याचप्रमाणे कोकणच्या गणेशोत्सवाचे चाकरमानीही अगदी तितक्याच श्रद्धापूर्ण वातावरणात स्वागत करतात.

कोकणातल्या दूरवर गर्द हिरव्या झाडीत लपलेल्या आणि लालचुटूक कौलांनी नटलेल्या घरात वेगळीच लगबग सुरू असते, ती म्हणजे गणेशोत्सवाची. वाडीवस्ती ते गावागावांतील प्रत्येक घराघरांत चाकरमान्यांच्या स्वागतासाठीही इथली मंडळी सज्ज झालेली असतात. महिना महिना आधी गावाकडे जाणाºया गाड्यांची, रेल्वेंची, आरक्षण येथे फुल्ल झालेली असतात. जगाच्या पाठीवर कोठेही असणारा चाकरमानी हा गणेशोत्वाला हमखास येणारच, हे कुणाला सांगायला नको.

घरातली स्वच्छता, सारवलेली अंगणे, रांगोळ््यांनी सजलेला उंबरा, गणरायाच्या प्रतिष्ठापनाची बैठक व्यवस्था व आजूबाजूचा परिसरही सुंदर, गणपतीजवळ केलेली आरासही नयनरम्य व तितकीच लक्षवेधी असते. त्यातच माजघरात दरवळणारी सुगंधी उदबत्ती, धूप गणरायाच्या प्रतिष्ठापनेची साक्ष देतो. गणरायाच्या आगमनाने व प्रतिष्ठापनेने संपूर्ण कोकणातल्या वाडीवस्तीमध्ये गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आगळे-वेगळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आनंदी, उत्साही वातावरणाने सारे चाकरमानी व स्थानिक भारावून गेलेले असतात.

शेजारी-पाजारी, वाडीवस्तीवरती ताशांचा कडकडाट, तबलावादन, ढोलकीची साथ, घंटानाद, टाळ-मृदंगाचा नाद आणि आरतीच्या सुमधूर आवाजाचा तासन्तास स्वर टिपेला जातो. भजन आणि भजनाच्या चढाओढीत अबालवृद्धांपासून सारेचजण यात रमलेले असतात. त्यानंतरची प्रसाद वाटपाची लगबग, खाणाºयाला आणि वाटणाºयाला दोघांनाही आनंदाची वाटते. महानैवेद्याच्या उखडीच्या मोदकाच्या चवीने अवघ्या तनमनाला समाधान व तृप्ती लाभते.

संपूर्ण गणेशोत्सवात नाच, नमन, खेळ््ये, पत्त्यांचे डाव उत्तरोत्तर रंगलेल्या डावात अगदी गणेशोत्सवाचे एकामागून एक दिवस सरत असतात. जोडीला वाड्यावस्त्यांवरील व गावांतील भजनी मंडळे ही घरोघरी जाऊन आणखीनच घरात गणरायाच्या आगमनाची सुखद जाणीव करून देतात. दररोज होणाºया भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने तर संपूर्ण कोकणचे वातावरण हे गर्द अंधारातही मनशांती देणारा वाटतो.

इथल्या गणरायाच्या आरतीला दररोज वाडीवस्तीवरील सर्वजण एकमेकांच्या घरी उपस्थित राहून रंगत वाढवितात. अशा या गणरायाचे भक्तीमय वातावरणात होणारे आगमन म्हणजे कोकणवासियांची खºया अर्थाने दिवाळी व महोत्सवच असतो. सर्वांना आपलासा वाटणाºया या गणरायाच्या जोरदार स्वागत झाले आहे. कोकणातील गणेशोत्सव सर्वांनी एकदा तरी अनुभवावाच.

Web Title: Ganapati is in Konkan! The festival is Diwali.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.