Ganeshotsav : देवरूखच्या चौसोपीतील प्रसिध्द गणेशोत्सव, आठवी पिढी करीत आहे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:14 PM2018-09-10T18:14:58+5:302018-09-10T18:20:18+5:30
गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव दिनांक १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. जोशी कु टुंबियांची आठवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे.
देवरूख : गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव दिनांक १७ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. जोशी कु टुंबियांची आठवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहे.
जोशी यांच्या घराण्यातील सातव्या पिढीचे रघुनाथ उर्फ पंतभाऊ जोशी यांनी या उत्सवाला चार चाँद लावत उत्सवाला व्यापक स्वरूप आणून दिले. त्यांनी हा उत्सव वयाच्या १६ व्या वर्षीपासून वडीलधाऱ्यांबरोबर साजरा केला. त्यांना त्यांच्या जीवनप्रवासातील दु:खांच्या छायेतून गणरायानेही अनेकवेळा बाहेर काढले होते.
त्यांच्या पश्चात आठव्या पिढीतील नातेवाईकांच्या हातात उत्सवाची धुरा आली आहे. यानुसार यावर्षीचा उत्सव १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. उत्सवासाठीची गणेशमूर्ती सात्वीक भावाने देवरूख येथील भोंदे कुटुंबिय घडवत असतात. भोंदे यांच्या गणेश चित्रशाळेतून सकाळी येथील गणपतीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले.
मूर्ती आणल्यावर सकाळी श्रींची स्थापना, द्वारपूजन, नृत्य, मध्यांन्हपूजा, नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी भक्तगणांची सहस्त्रावर्तने झाली. रात्री सायंपूजा, आरती, मंत्रपुष्प, उपाहार नैवेद्य, प्रसाद, रात्रौ उशिरा पुराण कीर्तन होणार आहे. याचप्रमाणे प्रतिदिन कार्यक्रम होणार आहेत.
गणेशाचा जन्मोत्सव हा चतुर्थीला साजरा केला जातो. पूजा, जन्मोत्सव, नवस करणे, नवस मानवणे, महाभिषेक, महापूजा, आरती, मंत्रपुष्प, प्रसाद, पुराण, कीर्तन तसेच महाप्रसाद, रात्री स्थानिकांचे करमणूक कार्यक्रम, पहाटे पुराण कीर्तन व नृत्य, प्रसाद होणार आहे.