पावणेतीन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:31+5:302021-09-21T04:35:31+5:30

रत्नागिरी : उद्योग- धंद्यासाठी घेतलेले २ लाख ८६ हजार रुपये परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी एका विरोधात ...

A gang of three and a half lakhs | पावणेतीन लाखांचा गंडा

पावणेतीन लाखांचा गंडा

Next

रत्नागिरी : उद्योग- धंद्यासाठी घेतलेले २ लाख ८६ हजार रुपये परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सन २०१३ ते २०२० या कालावधीत घडली आहे.

जनक नवीनचंद्र पटेल (रा. जामनगर, गुजरात) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात संभाजी हरिभाऊ शिंदे (४०, रा. तांबटआळी, रत्नागिरी ) यांनी शनिवार १८ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, जनक पटेल याने संभाजी शिंदे यांच्या मैत्रीचा फायदा घेत उद्योगधंद्यासाठी वेळोवेळी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यास सांगितले. संभाजी यांनी त्याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली असता पटेलने खोट्या चेकचे फोटो पाठवून त्यांची फसवणूक केली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Web Title: A gang of three and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.