राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:54 PM2020-06-22T14:54:22+5:302020-06-22T14:55:16+5:30
लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.
राजापूर : लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.
यावर्षी बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या गंगामातेचे आगमन झाले होते. हे आगमन भाविकांना सुखावणारे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने गंगा स्थानाकडे जाणारा मार्ग बंद केला आहे. तेव्हापासून गंगेवर भाविकांना स्नानाला जाता आलेले नाही. केवळ गंगापुत्रवगळता भाविक स्नानाची पर्वणी साधू शकलेले नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राजापुरातील गंगाक्षेत्र खुले होण्याची आशा भाविकांना होती. मात्र, गंगा क्षेत्राकडे जाणारा मार्ग खुला न करण्यात आल्याने कोणालाही गंगा स्नान करता आलेले नाही. त्यातच शनिवारी रात्री गंगा अंतर्धान पावली. त्यामुळे आजवरच्या इतिहासात प्रथमच गंगा क्षेत्र बंद ठेवले होते.