म्हणे, कोरोना रुग्णाला इंजेक्शन देऊन मारतात; गावकऱ्यांनी रुग्णवाहिका रोखली, पोलिसांवरही दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 02:27 PM2020-07-22T14:27:36+5:302020-07-22T20:57:20+5:30

कोरोनाचा रूग्ण घेऊन येण्यासाठी साखरी नाटे येथे गेलेल्या रूग्णवाहिकेला तेथील जमावाने विरोध केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला.

Gangajama throws stones at the police to prevent Corona from taking the patient | म्हणे, कोरोना रुग्णाला इंजेक्शन देऊन मारतात; गावकऱ्यांनी रुग्णवाहिका रोखली, पोलिसांवरही दगडफेक

म्हणे, कोरोना रुग्णाला इंजेक्शन देऊन मारतात; गावकऱ्यांनी रुग्णवाहिका रोखली, पोलिसांवरही दगडफेक

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना रूग्ण नेऊ नये म्हणून गँगजमावाची पोलिसांवर दगडफेकसाखरीनाटे येथील प्रकार, परिचारिका, पोलीस जखमी

राजापूर : कोरोनाचा रूग्ण घेऊन येण्यासाठी साखरी नाटे येथे गेलेल्या रूग्णवाहिकेला तेथील जमावाने विरोध केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार कळल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली आणि त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. 

साखरी नाटे येथील एका ३२ वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आणण्यासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका बुधवारी सकाळी साखरी नाटे येथे गेली. मात्र, तेथे अचानक जमाव जमला आणि जमावाने रूग्णाला नेण्यास मनाई केली. जमाव आणि त्यांचा विरोध पाहून रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पण, पोलिसांची गाडी आल्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला. या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस आणि एक परिचारिका जखमी झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या भागातील एक रुग्ण उपचाारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. मात्र, उपचारासाठी नेण्यात आलेल्या रुग्णाचे निधन झाले. त्यानंतर, त्या रुग्णावर अंत्यसंस्कारही कोविड पॉझिटीव्हच्या नियमानुसार झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांनी रुग्णालयातील उपचाराची भीती घेतली आहे. या भीतीमुळेच सदरील रुग्णालाही रुग्णालयात नेण्यास, स्थानिकांनी विरोध केला. विशेष म्हणजे रुग्णालयात नेऊन इंजेक्शन देऊन रुग्णाला मारतात, असा अपप्रचार आणि चर्चा या परिसरात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांकडून रुग्णाला नेण्यास विरोध करण्यात येत होता. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील सुज्ञ व अनुभवी लोकांशी चर्चा केली, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर, स्थानिकांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्यास परवानगी दिली. 

Web Title: Gangajama throws stones at the police to prevent Corona from taking the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.