Ratnagiri- गांजा विक्री प्रकरण: बॉडीबिल्डर अमर लटके याला पुन्हा अटक

By संदीप बांद्रे | Published: October 30, 2023 07:17 PM2023-10-30T19:17:37+5:302023-10-30T19:24:36+5:30

चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू

Ganja sale case: Bodybuilder Amar Latke arrested again | Ratnagiri- गांजा विक्री प्रकरण: बॉडीबिल्डर अमर लटके याला पुन्हा अटक

Ratnagiri- गांजा विक्री प्रकरण: बॉडीबिल्डर अमर लटके याला पुन्हा अटक

चिपळूण : चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी सात जणांना अटक केली असून गांजा विक्रेता बॉडीबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

चिपळूणात चार तरूण गांजा ओढताना विरेश्वर कलनी नजिक सापडले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. या तरूणांनी आपण गांजा अमर लटके यांच्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर जिम व्यावसायीक बॉडीबिल्डर अमर लटके याला अटक झाली. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. मात्र याच दरम्यान धरपकड सुरू असताना विजय शांताराम राणे (५६, मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) यांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली. 

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमर लटके याच्याकडून आठ दिवसांपुर्वी गांजा खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर जामिनावर सुटलेला अमर लटके याला पुन्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेऊन अटक केली आहे. याशिवाय रविवारी रात्री शहरात गस्त सुरू असताना अमीर उमर शेख (२३, मुरादपूर मिठागरी मोहल्ला) याला गांजाा सेवन प्रकरणी अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून प्रत्येकवेळी आपण गांजा अमर लटके याच्याकडून खरेदी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लटके गांजा कोठून आणतो, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून याप्रकरणी पोलिसांनी गांज्याचे रॅकेट उद्धस्थ करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

चिपळूणात झालेल्या नागरिकांच्या बैठकीत देखील हाच मुद्दा उपस्थित झाला. गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतानाच पोलिसांनी गांजा पुरवठादार आणि त्यामागे असलेले रॅकेट उघड करून त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Ganja sale case: Bodybuilder Amar Latke arrested again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.