गणपतीपुळेच्या संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

By admin | Published: June 30, 2017 04:11 PM2017-06-30T16:11:56+5:302017-06-30T16:11:56+5:30

समुद्राच्या वाढलेल्या उधाणाचा परिणाम

Ganpatipule's protector wall consists of two pieces | गणपतीपुळेच्या संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

गणपतीपुळेच्या संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

Next

आॅनलाईन लोकमत

गणपतीपुळे , दि. ३0 : गणपतीपुळे तीर्थक्षेत्री उधाणामुळे महाकाय येणाऱ्या लाटांनी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केल्याचे दिसून येत होते. मात्र, गेले दोन दिवस समुद्राच्या वाढलेल्या उधाणामुळे मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे दोन तुकडे झाले.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सध्या तुरळक गर्दी पाहावयास मिळत असून, गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या उधाणामुळे पाणी अगदी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर आपटून मंदिरापर्यंत येत असल्यामुळे लाटेची मज्जा अनेक पर्यटकांनी घेतली.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात उंच उडणाऱ्या लाटा अगदी गणपतीपुळे देवस्थानच्या संरक्षक भिंतीला लागत होत्या. भिंतीच्या आतून अनेक पर्यटक या लाटांचे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते. काही हौशी पर्यटक या उंच उडणाऱ्या लाटा अंगावर झेलताना दिसत होते.

समुद्र खवळलेला असल्यामुळे व लाटा उंचच उंच उडत असल्यामुळे या परिसरात कोणीही आंघोळीसाठी जाऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून समुद्र चौपाटीवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. दिवसभर हे सुरक्षरक्षक डोळ्यात तेल घालून कामगिरी बजाविताना दिसत होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी समुद्र चौपाटीवर संरक्षक कठड्यावर पेट्रोलिंग करताना हे सुरक्षा रक्षक दिसून येत होते.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या उधाणामुळे या परिसरात समुद्राच्या उंच लाटा अगदी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संरक्षण कठड्यावर आपटत होत्या. याच संरक्षण कठड्यावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकेही लावण्यात आली आहेत.

मात्र, गेल्या वर्षी अशाच आलेल्या समुद्राच्या उधाणामुळे या कठड्याच्या अनेक पायऱ्या वाहून गेल्या होत्या. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे मत व्यक्त होत आहे. या संरक्षण कठड्याचे सार्वत्रिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर दोन तुकडे झाल्याने कामाचा दर्जा समोर आला आहे.

Web Title: Ganpatipule's protector wall consists of two pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.