खेड-भोस्ते-रेल्वेस्टेशन मार्गालगत कचऱ्याचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:10+5:302021-04-20T04:32:10+5:30
खेड : शहरातून भोस्तेमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गालगत जगबुडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत ...
खेड : शहरातून भोस्तेमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गालगत जगबुडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. या प्रकाराकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने आरोग्याला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकीकडे काेराेनाचा प्रादु्र्भाव वाढत आहे तर खेड तालुक्यात मात्र आरोग्यदायक सवयी व स्वच्छता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तालुक्यातील खेड - भोस्ते ते रेल्वेस्टेशन रस्त्यालगत भोस्ते गावाच्या हद्दीत जगबुडी नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठला आहे. या मार्गावरून दररोज हजारो लोक ये-जा करतात. मात्र, ग्रामपंचायत याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने रोगराई पसरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यालगत व बारमाही पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या जगबुडी नदीपात्रापासून अतिशय जवळ हा कचरा डेपो बनला आहे. त्याकडे तातडीने तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
...........................
khed-photo191 खेड तालुक्यातील खेड-भोस्ते-रेल्वेस्टेशन मार्गालगत कचऱ्याचा ढीग तयार झाला आहे.