‘गॅस’मधील आंदोलन पेटणार?

By Admin | Published: March 18, 2015 10:08 PM2015-03-18T22:08:27+5:302015-03-18T23:59:55+5:30

साखळी उपोषण : प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आता ग्रामस्थांचाही सहभाग

'Gas' agitation? | ‘गॅस’मधील आंदोलन पेटणार?

‘गॅस’मधील आंदोलन पेटणार?

googlenewsNext

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सी अ‍ॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २३ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. एन्रॉन प्रकल्पग्रस्त असलेले यशवंत बाईत व ग्रामस्थही या उपोषणात सहभागी होणार असल्याचे, रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या नावे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पासाठी म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी अंजनवेल, कातळवाडी, वेलदूर, घरटवाडी व रानवी (गुहागर) येथील सुमारे ६१० हेक्टर जमिन शासनाने संपादित केली आहे. या संपादित जमिनीत यशवंत सोनू बाईत यांची १४ एकर जमीन समाविष्ट आहे. प्रकल्पात कामगार भरती करण्यासाठी मा. मुुंबई उच्च न्यायालयाने व रीट पिटीशन २७३५/९४ मधील काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
कंपनीकडून या सुचनांचा आदर करुन कामगार भरती केली जात नाहीच, परंतु जे कामगार आपल्या कंपनीत कामाला आहेत त्यांच्यावरही आपल्या कंपनीचे अधिकारी युटिलीटी पॉवर टेक लि. चे अधिकारी व सब ठेकेदार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करत आहेत. याविषयी बैठक घेऊन चर्चा करण्यासाठी प्रकल्पस्थळावरच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन तसेच लेखी पत्र देऊनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. जिल्हाधिकारी यानीही संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चर्चा करण्याचे व सूचना करुनही याची दखल घेतली गेली नाही.अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून सोमवार २३ मार्चला कामगार उपोषण करणार आहेत. यासाठी अंजनवेल ग्रामस्थही सहभागी होणार असल्याचे यशवंत बाईत यांनी निवेदनात म्हटले
आहे.
यशवंत बाईत यांनी एन्रॉन विरोधी लोकहक्क समितीचे प्रमुख म्हणून कंपनीमधील प्रकल्पग्रस्तांचे अनेक अन्यायग्रस्त विषय हाताळून न्याय मिळवून दिला आहे. तसेच गुहागर तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान अंजनवेल ग्रामपंचायतीचे सरपंच असल्याने उपोषणामध्ये यशवंत बाईत यांच्यासह ग्रामस्थही सहभागी होणार असल्याने हा उपोषणाचा लढा अधिक तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)

आता आक्रमक होणार...
रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पासाठी अंजनवेल, कातळवाडी, वेलदूर, घरटवाडी व रानवी (गुहागर) येथील सुमारे ६१० हेक्टर जमीन संपादित.
कंपनीतील कामगारांवर बेकारीची टांगती तलवार.
अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक .

Web Title: 'Gas' agitation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.