रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:49 PM2018-04-04T17:49:05+5:302018-04-04T17:49:05+5:30

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात आली.

Ghatanad of the Ratnagiri Bharip Mahasangh, slogan against the government | रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी

रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजीआरोपींना त्वरित पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात आली.

कोरेगाव - भीमा हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती व जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. अनुसूचित जाती - जमाती विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती अदा करावी, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासह खेड येथील पुतळ्याची विटंबना आणि कळंबस्ते येथे झालेल्या भीमस्मारकाची अवहेलनाप्रकरणी आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी भारिप बहुजन महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत घंटानाद केला.

या घंटानादमध्ये भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ सावंत, सुरेश मोहिते, सचिव विनोद कदम, सहसचिव श्रीकांत सकपाळ, रूपेंद्र जाधव, दीपक कांबळे, प्रमुख संघटक नितीन जाधव, संघटक रमेश सावंत, चंद्रकांत पवार, महेश सावंत, कायदेशीर सल्लागार संदीप कदम, जिल्हा युवक अध्यक्ष मुज्जफर मुल्ला तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर या मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी हे निवेदन स्वीकारले.

Web Title: Ghatanad of the Ratnagiri Bharip Mahasangh, slogan against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.