Ratnagiri: पैशाच्या मागणीला कंटाळून प्रेयसीचा गळा दाबून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:48 AM2023-10-14T11:48:35+5:302023-10-14T11:48:35+5:30

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना ...

Girlfriend murdered at Kondye in Lanja taluka after suffering from repeated demands for money | Ratnagiri: पैशाच्या मागणीला कंटाळून प्रेयसीचा गळा दाबून खून

Ratnagiri: पैशाच्या मागणीला कंटाळून प्रेयसीचा गळा दाबून खून

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना तब्बल अडीच महिन्यांनी शुक्रवारी उघडकीस आली आहे. वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८) असे मृत प्रेयसीचे नाव असून, पाेलिसांनी तिच्या खुनाप्रकरणी राजेंद्र गाेविंद गुरव (५३, रा. काेंड्ये-गुरववाडी) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोंड्ये येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचे याच राजेंद्र गोविंद गुरव याच्याशी प्रेमसंबंध हाेते. त्यानंतर वैशाली रांबाडे ही राजेंद्र गुरव याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होती. वारंवार हाेणाऱ्या पैशाच्या मागणीला राजेंद्र वैतागला होता. या दाेघांमध्ये दि. २८ जुलै रोजी रात्री मोबाइलवर जवळपास एक तास बोलणे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ती कुवे येथे डॉक्टरकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती.

मात्र, डाॅक्टरकडे न जाता ती राजेंद्र गुरव याच्यासाेबत दि. २९ जुलै रोजी कुवे येथे जंगलमय भागात गेली हाेती. राजेंद्र यांच्या मनामध्ये धगधगत असलेल्या रागातून त्याने वैशालीच्या मानेवर काठीने जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ताे घरी निघून आला.

वैशाली ही रात्र झाली तरी डॉक्टरकडून घरी न आल्याने तिच्या पतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या पतीने दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजेंद्र गुरव याची चाैकशी केली असता काहीच हाती लागले नाही.

तब्बल अडीच महिन्यांनंतर तिच्या पतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिस स्थानकात राजेंद्र गुरव याने तिला फूस लावून पळवून नेत गायब केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र गुरव याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी रात्री त्याची पोलिस कोठडीत चौकशी केली असता त्याने आपण वैशाली हिचा कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे सांगितले.

उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पोलिस फौजदार भालचंद्र रेवणे, पोलिस हवालदार जितेंद्र कदम, पोलिस हवालदार अरविंद कांबळे, पोलिस हवालदार दिनेश आखाडे, पाेलिस काॅन्स्टेबल नितेश राणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियांका कांबळे, चालक कॉन्स्टेबल चेतन घडशी, चालक सहायक पाेलिस फाैजदार संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात झाडाझुडपांमध्ये असलेल्या वस्तू शोधून काढल्या. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.

खरे बाेलतच नव्हता

पत्नी घरी न आल्याने पतीने फिर्यादीत राजेंद्र गुरव याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. राजेंद्र गुरव याच्यावर संशयाची सुई असल्याने त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, ताे पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नव्हता. तसेच तो काहीच खरे बोलत नसल्याने पोलिसही हतबल झाले होते.

वारंवार विचारणा

विवाहित महिला बेपत्ता झाल्यानंतरही तिचा शाेध लागत नसल्याने नातेवाईक व कुटुंबाकडून वारंवार विचारणा केली जात होती. मात्र, तिच्या बेपत्ता हाेण्यामागचे कारण समाेर येत नसल्याने पाेलिस चक्रावून गेले हाेते.

जंगलात सापडले साहित्य

संशयित राजेंद्र गुरव याला सोबत घेऊन पोलिसांनी कुवे येथील जंगलमय भागातील घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी मृत महिलेच्या वस्तू, साडी, ब्लाऊज पाेलिसांच्या हाती लागले. हे सर्व तिचेच असल्याचे तिच्या पतीने ओळखले. त्यावरून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनास्थळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Girlfriend murdered at Kondye in Lanja taluka after suffering from repeated demands for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.