देवरूख शहराला पुरेशी लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:50+5:302021-05-05T04:50:50+5:30
देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन देवरुख शहराला पुरेशी लस उपलब्ध ...
देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन देवरुख शहराला पुरेशी लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शेखर निकम यांच्याकडे दिले आहे.
तसेच १८ ते ४४ या वयोगटांसाठी कोविड लसीकरण केंद्र देताना संगमेश्वर तालुक्याला वगळ्याने तालुक्यातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचे मत व्यक्त केल. निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार निकम यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्या फोनद्वारे संपर्क साधला. संगमेश्वर तालुक्याला आणि देवरुखला पुरेशी लस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी चर्चा केली, तसेच १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र देवरुखमध्ये देणेबाबतही सूचना केली. देवरुखला लस उपलब्ध करून देण्याबराेबरच लसीकरण केंद्र हाेण्याबाबत आपण निश्चितच प्रयत्न करू, असे शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सान्वी संसारे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सुशांत मुळ्ये, हनिफ हरचिरकर, नीलेश भुवड, तुकाराम किर्वे उपस्थित होते.
..................................
देवरुख शहराला पुरेशी लस उपलब्ध करून देण्याबराेबर, लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित हाेते.