गणेश मोरे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:40+5:302021-05-11T04:32:40+5:30
खेड : चिंचघर गणाचे पंचायत समिती सदस्य गणेश मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचतर्फे आयोजित काव्यलेखन उपक्रमात ‘मी ...
खेड : चिंचघर गणाचे पंचायत समिती सदस्य गणेश मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचतर्फे आयोजित काव्यलेखन उपक्रमात ‘मी एक भारतीय नागरिक’ या विषयावर काव्यलेखन केले. याबद्दल त्यांचा सन्मानपत्राने गौरव करण्यात आला.
महामार्गावर धुळीचे लोळ
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शहर परिसरात सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. महामार्गावर पाणी मारले जात नसल्याने, उन्हात या धुळीचा अधिकच त्रास होतो. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सतत धुळीचे लोळ निर्माण होत असल्याने पाण्याचा मारा करण्याची मागणी केली जात आहे.
टंचाईग्रस्त वाड्यांना टँकर
खेड : मनसे सरचिटणीस व कामगार सेनेचे अध्यक्ष व मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट विश्वस्त पाणीदूत डॉ.मनोज चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल कुर्ला बॅच सन १९८४ बॅच व मनसेच्या माध्यमातून तालुक्यातील संगलट येथील चार टंचाईग्रस्त वाड्यांना टँकर उपलब्ध केला आहे. नुकताच या कामाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
भरणेत वाहतूककोंडी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी आंबवलीकडे जाणारा मार्ग मध्यवर्ती ठिकाणी बंद करण्यात आला आहे. आधीच दोन्ही बाजूंकडून एकेरी मार्गाचा अवलंब व विशेषतः अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होत होती. त्यात आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाचा विस्तार वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.