युवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:32+5:302021-08-25T04:36:32+5:30
वाहनचालकांत नाराजी देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर महामामार्गावरील चालकांसाठी लावलेल्या फलकांवरती पावसामुळे वेली चढल्याने व झाडांच्या फांद्यांमुळे झाकोळले गेले आहे. त्यामुळे ...
वाहनचालकांत नाराजी
देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर महामामार्गावरील चालकांसाठी लावलेल्या फलकांवरती पावसामुळे वेली चढल्याने व झाडांच्या फांद्यांमुळे झाकोळले गेले आहे. त्यामुळे वाहनचालकांना सूचना दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. झाडी तोडण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
उन्हाच्या झळा
रत्नागिरी : ऐन ऑगस्टमध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ‘ऑक्टोबर हिट’प्रमाणे हिट वाढली असून कडकडीत उन्हामुळे पिके होरपळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्यानेही येत्या चार दिवसांत पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज वर्तविला आहे.
बांधकाम मंत्र्यांना पत्र
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांबाबत माजी आमदार हुस्रबानू खलिफे यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंत्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाहीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा गौरव
दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आठवीसाठी झालेल्या एनएमएमएस गुणवत्ता परीक्षेत मळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. याबद्दल अथर्व फिलसे, निखिल पांदे या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक दिनेश चिपटे उपस्थित होते.