चिपळुणात पावणेदोन लाखांचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:50 PM2021-05-29T17:50:24+5:302021-05-29T17:53:04+5:30

liquor ban Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून १ लाख ७६ हजार ६४० रूपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. ही कारवाई २८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Goa-made foreign liquor worth Rs 52 lakh in Chiplun | चिपळुणात पावणेदोन लाखांचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा

चिपळुणात पावणेदोन लाखांचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा

Next
ठळक मुद्देचिपळुणात पावणेदोन लाखांचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठाराज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची कारवाई

चिपळूण : तालुक्यातील कोंढे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून १ लाख ७६ हजार ६४० रूपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. ही कारवाई २८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील कोंढे येथे गोवा बनावट विदेशी मद्यसाठा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला मिळाली़ त्यानुसार विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, प्रभारी अधीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने कोंढे येथे छापा टाकला. यावेळी गोवा बनावट गोल्डन एस. व्हिस्कीचा १ लाख ७६ हजार ६४० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, सुनील सावंत, जवान विशाल विचारे, सागर पवार यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गजानन शंकर जमदाडे (५७, रा. कोंढे, चंदनवाडी) व प्रीतेश प्रदीप देवळेकर (३७, रा. चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असताना अवैध गावठी दारूची व गोवा बनावट मद्याची विक्री होऊ नये. यासाठी अवैध दारूधंद्यावर करडी नजर ठेवणार असल्याचे अधीक्षक वैद्य यांनी सांगितले.
 

Web Title: Goa-made foreign liquor worth Rs 52 lakh in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.