कुंभार्ली घाटात पकडली दीड कोटींची गोवा बनावटीची दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:53 AM2021-06-16T11:53:04+5:302021-06-16T11:54:45+5:30
liquor ban Excise Department Ratnagiri : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात एका ट्रक मधून सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचा गोवा बनावटीची दारु वाहतूक करताना आढळून आला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कोकणातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात एका ट्रक मधून सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचा गोवा बनावटीची दारु वाहतूक करताना आढळून आला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कोकणातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
या ट्रक विषयी येथील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री घाटातच हा ट्रक पकडला. त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. ट्रक मध्ये लाकडी पट्ट्यांच्या बॉक्स मध्ये सर्व माल सील केलेला होता. अखेर पोलिसांना हे लाकडी बॉक्स तोडावे लागले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या कारवाईत २५ हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. संबंधित ट्रक रात्री उशिरा खेर्डी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात आणून ठेवला आहे. याप्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.