मिनी बसमधून गोवा मद्याची वाहतूक रोखली

By admin | Published: December 20, 2014 11:36 PM2014-12-20T23:36:18+5:302014-12-20T23:36:18+5:30

चार आरोपींना अटक

Goa prevented drunkenness from the mini bus | मिनी बसमधून गोवा मद्याची वाहतूक रोखली

मिनी बसमधून गोवा मद्याची वाहतूक रोखली

Next

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क खात्याने टाकलेल्या धाडीत मिनीबसमधून चाललेली गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली आहे. एकूण १७ हजार ८४०रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.
शनिवारी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क लांजा हे कर्मचाऱ्यांसह रात्र गस्त घालत असताना गोव्याकडून खेडच्या दिशेने जाणारी फोर्स कंपनीची प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस (एमएच ०८ ई ९१७२) तपासणीसाठी थांबवण्यात आली. त्यावेळी या बसमध्ये गोवा बनावटीच्या ७५० मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या १२ बॉटल्स, रमच्या ७५० मिली क्षमतेच्या १३ बॉटल्स, ६५० मिली क्षमतेच्या बिअरच्या ३ तसेच ३३० मिलीच्या १२ तसेच १८० मिली रॉयल स्टँग व्हिस्कीच्या २ बॉटल्स अशा एकूण ४२ सिलबंद गोवा मद्याच्या बॉटल्स दिसून आल्या. हा १७ हजार ८४० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. या जप्त मुद्देमालापैकी दोन सिलबंद बॉटल्सचा रासायनिक पृथ:करणासाठी नमुना घेण्यात आला आहे. याप्रकरणी नंदकुमार मधुकर मोरे (३५), रुपेश प्रकाश मोरे (२२), सुमित राजाराम चिकणे, महेश संजय जाधव (२७, सर्व मोहाने, खेड) या चार आरोपींना अटक करुन त्याच्या ताब्यातून १७ हजार ८४० रुपये किमतीच्या गोवा बनावट विदेशी मद्यासह मिनीबसही जप्त करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Goa prevented drunkenness from the mini bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.