गोगटे जोगळेकर - वालावलकर महाविद्यालयात सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:26+5:302021-07-07T04:39:26+5:30
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालावलकर मेडिकल महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. लोकोपयोगी संशोधनास चालना मिळावी ...
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालावलकर मेडिकल महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. लोकोपयोगी संशोधनास चालना मिळावी म्हणून बी. के. एल. वालावलकर मेडिकल महाविद्यालय जे महाराष्ट्र युनिवर्सिटी हेल्थ सायन्स यांच्याशी संलग्न आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य करारातंर्गत फॅकल्टी स्टूडेंट, एक्स्चेंज स्टुडेंट इंटर्नशिप, संशोधन सहकार्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन दोन्ही आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यास आणि रोगसुचक सामग्री स्वस्त आणि सुलभ बनविण्यासाठी लागणाऱ्या संशोधनावर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.
सामंजस्य करारासाठी वालावलकर मेडिकल महाविद्यालायातर्फे संचालक डॉ. सुवर्णा पाटील, टाटा मेमोरिअल सेंटरशी संलग्न वरिष्ठ संशोधक डॉ. रिटा मुल्हेकर, डॉ. नेताजी पाटील, डॉ. रोहित भट, डॉ. अनुप निलावार उपस्थित होते तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. चित्रा गोस्वामी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुखांची उपस्थिती लाभली होती. सामंजस्य करार प्रत्यक्षात येण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. विवेक भिडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.