चांगल्या पावसामुळे पीकस्थिती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:43+5:302021-08-18T04:37:43+5:30

रत्नागिरी : यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील पूरजन्य गावांतील स्थिती वगळता अन्य गावांतील पिकांची स्थिती उत्तम आहे. ...

Good crop conditions due to good rains | चांगल्या पावसामुळे पीकस्थिती उत्तम

चांगल्या पावसामुळे पीकस्थिती उत्तम

Next

रत्नागिरी : यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील पूरजन्य गावांतील स्थिती वगळता अन्य गावांतील पिकांची स्थिती उत्तम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६,२०४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४२३२.२ मिलिमीटर इतका पाऊस जास्त झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी ३,५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. चालूवर्षी पहिल्या अडीच महिन्यातच सरासरी २,९११.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात ६३ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली, १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लागवड केली आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी किनाऱ्यालगतच्या गावात पाणी शिरल्याने पुराच्या पाण्यासह माती, दगड भात खाचरात येऊन साचले. त्यामुळे लागवड केलेल्या शेतीचे नुकसान झाले असले, तरी अन्य भागातील हळवी, गरवी, निमगरव्या वाणांची स्थिती उत्तम आहे. शेतकऱ्यांनी तण बेणणीची कामे पूर्ण केली असून, खताची मात्राही देण्यात आली आहे. हळवे भात पोटरीस येण्याच्या तयारीत आहे. रोपाची वाढही चांगली झाली आहे. संततधार पावसापेक्षा ऊन-पाऊस असे संमिश्र वातावरण राहिले, तर पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनही उत्तम होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असून, कीड, रोगराईचा प्रादुर्भाव झालेला नाही.

लवकर पेरण्या झाल्यामुळे लागवडीचे कामही वेळेवर पूर्ण झाले. मध्येच पावसाने काही काळ उसंत घेतली असली, तरी नंतर मात्र पाऊस चांगला झाल्याने लागवडीची कामे रेंगाळली नाहीत. रोपांची वाढही चांगली झाली असून, वातावरण सध्या पिकासाठी पोषक आहे.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

लाॅकडाऊन असताना खते, बियाणे कृषी विभागाकडून वेळेवर उपलब्ध झाली. शिवाय आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याने लागवड वेळेत पूर्ण करता आली. पिकेही उत्तम आहेत.

- मंदार पाष्टे, देवरूख

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्यांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी लागवड वेळेवर पूर्ण झाली. पिकासाठी पोषक वातावरणामुळे पिके सुस्थितीत आहेत.

- दीपक, रेवाळे, खंडाळा.

लागवडीचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टर)

तालुका एकूण क्षेत्र

मंडणगड ४८९५

दापोली ७०९२

खेड १०२५१.२४

चिपळूण १०२४२.६६

गुहागर ५८२८

संगमेश्वर ११५८८.१५

रत्नागिरी ७६२४

लांजा ७२२४

राजापूर ८६००

एकूण ७३,३९३.०५

Web Title: Good crop conditions due to good rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.