चिपळूण शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:50+5:302021-06-28T04:21:50+5:30
अडरे : चिपळूण नगर परिषद व जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक १३ मधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ...
अडरे : चिपळूण नगर परिषद व जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक १३ मधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा लसीकरण कार्यक्रम पाग मराठी शाळा येथे घेण्यात आला. या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्थानिक नगरसेविका सई चव्हाण, माजी नगरसेवक मिथिलेश नरळकर, माजी नगरसेवक संजय तांबडे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, मुख्याध्यापक मोरे, माधव चितळे, शिवसेना उपविभागप्रमुख महेंद्र कांबळी, अमेय चितळे, संदेश गोरिवले, मिथील भागवत, परिचारिका दीपाली चिले उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेदरम्यान चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी भेट दिली. या लसीकरण मोहिमेचा पाग विभागातील ११० नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी आपल्या भागात लसीकरण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना लसीकरणाला जाण्या-येण्यासाठी स्थानिक नगरसेविका सई चव्हाण, माजी नगरसेवक मिथिलेश नरळकर, गणेश खेडेकर यांच्यातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.