हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:59 PM2022-04-12T18:59:47+5:302022-04-12T19:00:23+5:30

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला ...

Google courier company mobile number searched, Online fraud of Rs 93,000 for an old woman in Hedvi | हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

Next

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. केसरी विश्वनाथ नागवेकर असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव असून, हा प्रकार ९ एप्रिल राेजी घडला.

या फसवणुकीबाबत केसरी विश्वनाथ नागवेकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. विश्वनाथ नागवेकर यांच्या पत्नीने ९ एप्रिल राेजी रात्री ८ वाजता गुगलवर सर्च करुन कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर त्यांनी फाेन करुन कुरिअरबाबत माहिती विचारली. त्यानंतर फोनवरील अज्ञात व्यक्तीने कुरियर करण्यासाठी नाेंदणी करण्यासाठी दोन रुपये पाठवा, असे सांगून त्यासाठी लिंक पाठवली. ही लिंक पत्नीने पती विश्वनाथ नागवेकर यांना पाठवली.

नागवेकर यांनी पाठविलेल्या लिंकवर नाव, खाते क्रमांक आणि युपीआय पिन अशी माहिती भरली. त्यानंतर बँकेच्या खात्याला नाेंद असलेल्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी तो अज्ञात व्यक्तीला सांगितला. त्यानंतर थोड्यावेळाने नागवेकर यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून प्रथम ४९,९९९ आणि त्यानंतर लगेचच पुन्हा ४४ हजार असे एकूण ९२,९९९ रुपये खात्यातून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी फिर्याद नाेंदवली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Google courier company mobile number searched, Online fraud of Rs 93,000 for an old woman in Hedvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.