गौरीई आली घरा, उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:24 PM2019-09-05T18:24:55+5:302019-09-05T18:33:19+5:30
कोकणात धो धो कोसळणाऱ्या पावसात उत्सापूर्ण वातावरणात कोळी समाजाच्या माहेरवाशीणींनी पारंपरिक गीते म्हणत गौरीचे स्वागत केले.
Next
ठळक मुद्देगौरीई आली घरा, उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत कोळी समाजाच्या माहेरवाशीणींनी सादर केली पारंपरिक गीते
दापोली - कोकणात धो धो कोसळणाऱ्या पावसात उत्सापूर्ण वातावरणात कोळी समाजाच्या माहेरवाशीणींनी पारंपरिक गीते म्हणत गौरीचे स्वागत केले.
कोकणात गौरी गणपतीला विशेष महत्त्व असून कोळी समाजात गौरी उत्सव खास असतो. कोळी समाजात गौराईला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे मुसळधार पावसातही महिलांचा उत्साह कमी झालेला नाही.
मोठ्या थाटात माहेरवाशीणी गौराईचे स्वागत करत आहेत. दापोलीतील कोळी समाजात अजूनही ही प्रथा तेवढ्याच उत्साहात साजरी होते. गुरुवारी पारंपरिक गीत म्हणत गौराईचे उत्साहात स्वागत झाले.