रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Published: January 26, 2023 12:39 PM2023-01-26T12:39:45+5:302023-01-26T12:40:41+5:30

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी पार पडला.

Government committed to make Ratnagiri district a leader in all fields Uday Samant republic day | रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध : उदय सामंत

Next

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोनातून शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात दिली. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा गुरुवारी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद आहे असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. राज्यात रत्नागिरीवासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल असे सांगून सोहळ्यात आलेल्या नागरिकांचे अभिनंदन करीत आभार मानले. भटक्या जाती व जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून त्यांनी दादा इदाते यांचे अभिनंदन केले.

या दिमाखदार सोहळ्यात पोलीस दलासह, होमगार्ड, एनसीसी, ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथ यांचे संचलन यावेळी झाले. पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते भिकुजी इदाते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध गुणवंताचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Government committed to make Ratnagiri district a leader in all fields Uday Samant republic day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.