जिल्हा बँकेतही होणार सरकारी व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 06:23 PM2020-08-20T18:23:48+5:302020-08-20T18:24:46+5:30
शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे.
रत्नागिरी : शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे.
अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. अशा ठिकाणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक पोहोचली आहे. त्यामुळे शासकीय व्यवहारांसाठी ही बँक ग्रामीण भागातील लोकांसाठी सोयीची आहे. मात्र, आतापर्यंत सरकारची मान्यता नसल्याने तेथे शासकीय व्यवहार केले जात नव्हते. आता तो मार्ग मोकळा झाला आहे.
बँकेच्या ग्रामीण भागात सर्वत्र शाखा असल्याने जिल्हा परिषदेकडून शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फतच अदा केले जाते. ते शिक्षकांसाठी सोयीचे होते. आता शासकीय व्यवहारही येथे होतील.
ग्रामीण लोकांना फायदा
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांचा फायदा होईल. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ग्रामीण लोकांना अधिक सेवा देता येतील, असे संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.