मशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:29 PM2020-12-02T17:29:28+5:302020-12-02T17:30:55+5:30

fort, diwali, ratnagirinews दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरानजीकच्या गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही कोरोना परिस्थितीत नियमांचे पालन करत शेकडो मशालींच्या साक्षीने रविवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. मशालींच्या प्रकाशझोतात गोविंदगडाचा अवघा परिसर उजळून गेला होता.

Govindgad lit up with torches | मशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगड

मशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगड

googlenewsNext
ठळक मुद्देमशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगडत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने साजरा केला उत्सव

चिपळूण : दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरानजीकच्या गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही कोरोना परिस्थितीत नियमांचे पालन करत शेकडो मशालींच्या साक्षीने रविवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. मशालींच्या प्रकाशझोतात गोविंदगडाचा अवघा परिसर उजळून गेला होता.

गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्यावतीने दरवर्षी हा उत्सव साजरा होतो. यावर्षीही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मंदिरापासून देऊळवाडी, सहानवाडी अशी शिवज्योत घेऊन फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताश्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनीही सहभाग घेतला होता.

देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर, तुषार रेडीज, वसंत भैरवकर, उदय जुवळे, प्रशांत पोतदार आदींच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली. या गडाच्या चारही दिशेतील बुरुजांवर मशाली पेटवून उत्सव साजरा केला. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. यावेळी दिगंबर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती.

परशुरामच्या डोंगरावरही घडला दीपोत्सव

श्री क्षेत्र परशुराम देवस्थानतर्फे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरापासून काही अंतरावरील असलेल्या डोंगरावर एका भल्या मोठ्या दगडावर कोरीव काम केलेली पणती असून, तेथेही हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Govindgad lit up with torches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.