गरजूंना अन्नधान्य किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:20 AM2021-07-09T04:20:49+5:302021-07-09T04:20:49+5:30

राजापूर : बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक - मालक संघटना यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना ...

Grain kits for the needy | गरजूंना अन्नधान्य किट

गरजूंना अन्नधान्य किट

Next

राजापूर : बजाज कंपनी व राजापूर तालुका रिक्षा चालक - मालक संघटना यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील गरजू रिक्षा व्यावसायिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे रिक्षा व्यावसायिक संकटात आले आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

वेबिनारचे आयोजन

रत्नागिरी : खरीप हंगामातील भात पीक खत व्यवस्थापन व यांत्रिकीकरण या विषयावर ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांवार कारवाई होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती, रमाई घरकुल, सौरपथदीप, तांडा वस्ती अशा योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणी होते. पण या योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रश्नांवर समितीच्या बैठकीत चर्चा होते तेव्हा अधिकारी सूचना देऊनही उपस्थित न राहिल्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई हाेणार असल्याची माहिती सभापती परर्शुराम कदम यांनी दिली आहे.

कथाकथन स्पर्धेत यश

रत्नागिरी : मंथन पब्लिसिटी लिमिटेड व रायडर बॉईज ग्रुप यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत ल. ग. पटवर्धन शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी स्वरा खानोलकर या विद्यार्थिनीने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती.

सेवा कोलमडली

दापोली : दापोलीत बीएसएनएलची इंटरनेट सुविधा कोलमडल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दापोलीत गेली अनेक वर्षे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. सेवा ठप्पमुळे कामे होत नाहीत व आर्थिक नुकसानही होत आहे. काही गावात दुसरी सेवाही नाही. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांचे कौतुक

चिपळूण : कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी चिपळूण पोलीस स्थानकाला भेट दिली व तिथे असणाऱ्या सर्व पोलिसांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी चिपळुणात घडलेल्या घटनेच्या तपासात आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले. त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

मच्छिमारांचे लसीकरण

गुहागर : महिनाभरानंतर मच्छिमारांचा हंगाम सुरू होणार असून, मासेमारीसाठी समुद्रात जाणारे मच्छिमार बांधव दोन - चार महिने परत येत नाहीत. यामुळे कोरोना काळात मच्छिमारांना लसीकरणासाठी प्राध्यान्यक्रम देण्याबाबत जिल्हा परिषद सभेत चर्चा करण्यात आली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सदस्य महेश नाटेकर यांनी दिली.

Web Title: Grain kits for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.