ग्रामसेवकांचा संप; रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

By मेहरून नाकाडे | Published: December 19, 2023 06:56 PM2023-12-19T18:56:34+5:302023-12-19T18:57:01+5:30

रत्नागिरी : विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी जिल्ह्यातील ११८ ग्रामविकास अधिकारी व ४३९ ग्रामसेवक मिळून एकूण ५५७ ग्रामसेवक संपावर असल्याने ...

Gram sevak strike; The administration of 846 gram panchayats in Ratnagiri district has come to a standstill | ग्रामसेवकांचा संप; रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

ग्रामसेवकांचा संप; रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

रत्नागिरी : विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी जिल्ह्यातील ११८ ग्रामविकास अधिकारी व ४३९ ग्रामसेवक मिळून एकूण ५५७ ग्रामसेवक संपावर असल्याने जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे कडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करणे. ग्रामसेवक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे. शैक्षणिक अर्हतेसाठी कोणत्या शाखेची पदवी ग्राह्य धरणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १८५८ चे कलम ४९ चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे. विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढविणे. 

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दि.१ नोव्हेंब २००५ नंतर नियुक्ती दिलेले मात्र दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी भर्ती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवक यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे. कंत्राटी पध्दतीने ग्रामसेवक भरती बंद करणे. शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळणे या मागणीसाठी ग्रामसेवक संपावर गेले आहेत. दि.२० डिसेंबर पर्यंत हा संप सुरू राहणार आहे.

ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचा एक महिन्यापासून संप सुरू आहे. त्यातच आता ग्रामसेवकही संपावर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाजच ठप्प झाले आहे.

Web Title: Gram sevak strike; The administration of 846 gram panchayats in Ratnagiri district has come to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.