सकल ओबीसीतर्फे रत्नागिरीत उपोषण, जातनिहाय जनगणना हवी, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:15 PM2017-12-15T16:15:36+5:302017-12-15T16:26:06+5:30

देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसी समाजातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Grameen OBC demands Ratnagiri fast, caste caste census, Savitribai flowers, Bharat Ratna | सकल ओबीसीतर्फे रत्नागिरीत उपोषण, जातनिहाय जनगणना हवी, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी

ओबीसींच्या मागण्यांसाठी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसी समाजातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Next
ठळक मुद्देजातनिहाय जनगणना हवी, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणीसकल ओबीसीतर्फे रत्नागिरीत उपोषणलढा सावित्री आईच्या सन्मानाचा मोहिममहाराष्ट्रातील प्रमुख शहरात सह्यांची मोहीम

रत्नागिरी : देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसी समाजातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सकल ओबीसी समाजातर्फे ११ डिसेंबर २१०७ ते ३ जानेवारी २०१८ या कालावधीत लढा सावित्री आईच्या सन्मानाचा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख शहरात लाक्षणिक उपोषण व सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, या प्रमुख मागण्यांसह ओबीसीमधील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.

रत्नागिरीतही लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल ओबीसी समाजाचे नेते अशोक गीते, सकल ओबीसी समाजाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कांचन जांबोटी - नाईक यांच्या समवेत रत्नागिरीच्या दिलावर गोदड, भंडारी समाजाचे राजीव कीर, दत्तराज घोसाळे, कमलाकर थूळ, खलिल वस्ता, जितेंद्र शिवगण, अरूण मोर्ये, सरफराज शेकासन, रझनीम मोडम, सुधाकर शिवनेकर, बबन लिगारे, महंमद साखरकर, शांताराम गोंधळी, अखतर वाडकर, अजयेत बांगी, मुदस्सर सारंग, देखरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, दीपक दीपंकर, चिदानंद जाधव, उमेश शेट्ये आदींनी पाठिंबा दर्शवत सहभागी झाले होते.
 

Web Title: Grameen OBC demands Ratnagiri fast, caste caste census, Savitribai flowers, Bharat Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.