प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामसेवकाने केला गैरव्यवहार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:47+5:302021-09-25T04:34:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यातील तळघर-अणसपुरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानेच प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे. ...

Gramsevak misbehaved in Pradhan Mantri Awas Yojana? | प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामसेवकाने केला गैरव्यवहार?

प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामसेवकाने केला गैरव्यवहार?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : तालुक्यातील तळघर-अणसपुरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकानेच प्रधानमंत्री आवास योजनेत लाखो रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधून देतो, असे सांगून वृद्ध महिलेच्या खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील तळघर-अणसपुरे गावात प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकाने गावातील या योजनेची लाभार्थी असलेल्या एका वयोवृद्ध आजीला फसवल्याची तक्रार तिचा नातू संदीप सुरेश डाऊल यांनी केली आहे. आजीच्या बोटांचे ठसे घेऊन तिच्या बँक खात्यात शासनाकडून जमा झालेले तब्बल १ लाख २० हजार रुपये ग्रामसेवकाने परस्पर काढून घेतल्याची तक्रार संदीप डाऊल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारीनंतर खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तळघर-अणसपुरे येथील या घरकुल योजनेच्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशीही सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तक्रारदार संदीप डाऊल यांनी केवळ आपल्याच आजीची नाही, तर त्यावर्षी गावात मंजूर झालेल्या २७ घरकुलांमध्येही अशाच प्रकारे पैशांची अफरातफर केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

---------------------------

प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे

खेड तालुक्यातील तळघर-अणसपुरे येथील संदीप डाऊल यांनी घरकुलाची १ लाख २० हजारांची रक्कम ग्रामसेवकाने हडप केल्याची तक्रार केली आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. तसेच आपल्याला आलेल्या आदेशाप्रमाणे आपण प्राथमिक चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केल्याचे पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Gramsevak misbehaved in Pradhan Mantri Awas Yojana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.