दादा, चिपळूणच्या व्यापाऱ्याला वाचवा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:17+5:302021-07-26T04:29:17+5:30

चिपळूण : ‘आमची कमाई संपली आहे. आम्ही व्यापारी उद्ध्वस्त झालो आहोत. आता दादा, आता तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, ...

Grandpa, save Chiplun's trader! | दादा, चिपळूणच्या व्यापाऱ्याला वाचवा हो!

दादा, चिपळूणच्या व्यापाऱ्याला वाचवा हो!

Next

चिपळूण : ‘आमची कमाई संपली आहे. आम्ही व्यापारी उद्ध्वस्त झालो आहोत. आता दादा, आता तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, अशा शब्दात चिपळुणातील व्यापाऱ्यांनी चिपळूण बाजारपेठेतील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साकडे घातले. तर राणे यांनी आपल्या भावना समजल्या असून आपले प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही व्यापाऱ्यांना दिली.

चिपळुणातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी सोबत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार व भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासमवेत चिपळूण बाजारपेठेतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडल्या. व्यापारी म्हणाले की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पूर ओसरल्यानंतर आठ बोटी तरंगत होत्या, हे यांचे व्यवस्थापन. या अगोदर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा १४४ कलम लागू बाजारपेठ बंद ठेवली होती. मात्र, रेड अलर्टचा इशारा देऊनही येथील प्रशासनाने आम्हाला कोणतीही सूचना दिली नाही. आम्हाला जर अलर्ट केले असते तर इतके आमचे नुकसान झाले नसते. आमच्या नुकसानीला प्रशासन जबाबदार आहे. तसेच शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला सरसकट कर्जमाफी मिळावी आणि ती तत्काळ मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी राणे यांच्याकडे केली.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडीज, खजिनदार उदय ओतारी, अरुण भोजने, सूर्यकांत चिपळूणकर आदी व्यापारी तसेच नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, शौर्य निमकर, शुभम पिसे, महेश कांबळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Grandpa, save Chiplun's trader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.