नातीची भेट शेवटचीच ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:50+5:302021-05-19T04:32:50+5:30

खेड : तालुक्यातील लोटे येथून आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी-आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ...

The grandson's visit was the last | नातीची भेट शेवटचीच ठरली

नातीची भेट शेवटचीच ठरली

Next

खेड : तालुक्यातील लोटे येथून आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी-आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. आपल्या नातीसह मुलांसमवेतची ही भेट शेवटचीच ठरली.

प्रकाश घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना घोसाळकर बोरज गावातल्या आपल्या मूळ घरी राहत होते. बोरजपासून जवळच असलेल्या लोटे गावात त्यांचे दोन मुलगे, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. लोटे गावात घोसाळकरांची छोटीशी एक चाळ आहे. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांची नात खेळताना पडून जखमी झाली होती. या नातीला भेटायला हे आजी-आजोबा आपल्या दुचाकीवरून लोटेला गेले होते. तिला भेटून तिची विचारपूस करून ते बोरजला निघाले. बोरजला पोहोचलेदेखील. पण घोसाळकरवाडीमधल्या आपल्या घरी जात असताना वाटेत ३३ केव्हीची विद्युत वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात आले नाही आणि नकळत या तारेला त्यांचा स्पर्श झाला. प्रकाश आणि वंदना या पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला.

जवळपास असलेल्या काही ग्रामस्थांच्या ही दुर्दैवी घटना लक्षात आली. पण त्यांनी प्रसंगावधान राखत, संपर्कात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करत महावितरणला कळवलं आणि वीज प्रवाह खंडित करायला लावला. सोमवारी वाऱ्याचा जोर थोडा कमी झाल्यामुळे सायंकाळी दोघा नातीला भेटायला बाहेर पडले होते. पण त्यांना ठाऊकही नव्हते की आपल्या नातीची आणि आपल्या कुटुंबीयांची ही शेवटची भेट असेल.

या वादळी वाऱ्यांचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी खांब मोडून पडले. महावितरण प्रशासनाने सर्व विद्युतप्रवाह खंडित केला होता. पण वीज घेऊन येणाऱ्या अशा हायव्होल्टेज विद्युत तारांचा विद्युत भार मध्येच खंडित करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ही कोसळलेली तार विद्युतभारीतच राहिली. त्यातच घोसाळकरांवर काळाचा घाला आला.

Web Title: The grandson's visit was the last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.