‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:19+5:302021-07-05T04:20:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत’ने रक्तदान महाशिबिर राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केले आहे. जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकीतून ‘लोकमत’ने रक्तदान महाशिबिर राज्यभर विविध ठिकाणी आयोजित केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात भारतीय जैन संघटना आणि राजरत्न प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढीत आयोजित केलेल्या दुसऱ्या रक्तदान शिबिरालाही रविवार, ४ रोजी उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावर्षी कोरोनासंकटामुळे रक्ताची गरज वाढली आहे. मात्र, लोक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्याने नियमित होणारे रक्तदानही कमी झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ने संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर दि. २ ते १५ जुलै यादरम्यान रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. जिल्हा रुग्णालयात २ जुलै रोजी पहिले शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दुसरे शिबिर रविवारी पार पडले. यात भारतीय जैन संघटना, राजरत्न प्रतिष्ठान यांचे पदाधिकारी यांच्याबरोबरच शहर परिसरातील अन्य नागरिकांनीही रक्तदान केले. शिबिराला जाणीव फाऊंडेशनचेही सहकार्य लाभले.
या शिबिरात कस्तुरी सावंत, प्रथमेश भागवत, महेश शेवडे, किशोर जैन, स्वप्नील मुरकर, संजीव जैन, ललित शहा, नीलेश गुंदेचा, सचिन केसरकर, मयूरेश मडके, स्वरूप काणे, जयदीप परांजपे, राजेश कासार, भास्कर शिगवण, विश्वजित वीर, सुर्यकांत कटारिया, लोचन चाैघुले, शेखर पागडे, जस्मीन मोमीन, डाॅली ओसवाल, दुर्वांकुर चाळके, अमित सामंत, अल्पेश धावडे, प्रकाश पड्ये या रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली, शासकीय रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. सारिका डेरे तसेच अधिपरिचारक प्रभाकर मुळेकर, वैज्ञानिक अधिकारी विक्रम चव्हाण, भारती चव्हाण, टेक्निकल सुपरवायझर मयुरी वारंग, कक्षसेवक सुजित दुदवडकर, सफाईगार कृष्णा मकवाना, वाहनचालक संदीप वाडेकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
शिबिरावेळी भारतीय जैन संघटनेचे महेंद्र गुंदेचा, ललित शहा, संजीव गुंदेचा, सुमित ओसवाल, मुकेश गुंदेचा, वरुण ओसवाल, नीलेश गुंदेचा, नीलेश गांधी आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे, रूपेश सावंत, हेमंत चव्हाण, सचिन केसरकर, मयूरेश मडके, सूर्यकांत कटारिया, भूषण बर्वे, जया डावर, सतीश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते, तसेच जाणीव फाऊंडेशनचे महेश गर्दे, अमित सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
................................................
७ रोजी चिपळूण येथे शिबिर
७ जुलै रोजी ‘लोकमत’ आणि रोटरी क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चिपळूण शहरातील विवेकानंद सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे.