कोंडगावमध्ये लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:41+5:302021-07-07T04:39:41+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी लसीकरण शिबिर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ...
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी लसीकरण शिबिर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या लसीकरणात २२० जणांना लस देण्यात आली.
साखरपा प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणासाठी ग्रामस्थांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते यांनी योग्य नियोजन केल्याने काेणताही गाेंधळ झाला नाही. त्यामुळे सर्वांना वेळेत लस देणे शक्य झाले. यावेळी कोंडगाव सरपंच बापू शेट्ये यांनी लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी डॉ. पोपट आदाते, आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे, विनायक सुर्वे, फार्मसी सचिन वाघधरे, सचिन सकपाळ, शिल्पा राव, दीपिका पांचाळ, चारुलता सकपाळ, मधुरा यादव, प्रतीक्षा विचारे व अन्य आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. यावेळी कोंडगाव सरपंच बापू शेट्ये यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.
-------------------------------
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरणादरम्यान सरपंच बापू शेट्ये यांनी भेट देऊन माहिती घेतली. (छाया : संताेष पाेटफाेडे)